रियलमी पी 3 प्रो, पी3 एक्स लाँच
दमदार फिचर्स एकत्रित राहणार : अंदाजे 20 ते 30 हजारपर्यंत किंमत राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियलमी कंपनीने भारतात पी 3 आवृत्तीचा फोन सादर केला आहे. यामध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात रियलमी पी 3 प्रो आणि रियमलमी पी3 एक्स 5-जी मध्ये राहणार असल्याची माहिती आहे. खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साइटचा वापर करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मागील मॉडेल्सप्रमाणे, रियलमी पी3 एक्स 5 जी किंमत 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
रियलमी पी 3 प्रो
सदरच्या स्मार्टफोनमध्ये अनेक हाय-एंड फीचर्स राहणार असून प्रो मॉडेल क्वाड-कर्व्हड डिस्प्ले, अॅडव्हान्स्ड एरोस्पेस-ग्रेड व्हीसी कूलिंग सिस्टमसह येणार आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 7 एस 3 चिपसेटसोबत उपलब्ध होणार आहे.
पी3 प्रोची वैशिष्ट्यो
बॅटरी 6,000एमएएच बॅटरी, जी चार्जिंगसाठी 80 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन टिकाऊ बनवण्यासाठी आयपी66+आयपी68+आयपी 69 रेटिंग देखील जोडण्यात आले आहे. कंपनी तो गॅलेक्सी पर्पल, नेब्युला ग्लो आणि सॅटर्न ब्राउन रंगांमध्ये आणत आहे. हे ‘चमकदार रंग बदलणारे फायबर’ ने सुसज्ज आहे जे प्रकाश शोषून घेते आणि अंधारात चमकते. वापरकर्त्यांसाठी पकड सुधारण्यासाठी त्यात ‘42-अंश सोनेरी वक्रता’ असल्याचा दावा देखील केला जातो.