For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रियल मी जीटी 7 प्रो लॉन्च

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
रियल मी जीटी 7 प्रो लॉन्च
Advertisement

कोलकाता : चिनी स्मार्टफोन कंपनी रियल मी यांनी जीटी7 प्रो हा स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारामध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 इलाईट च् ााrपसेट असणार असून 120 हर्डझ्चा कर्व्हड् डिस्प्लेही देण्यात आलेला आहे.  6.78 इंचाचा डिस्प्ले या फोनला असणार असून 120 डब्ल्यूचा अल्ट्रा फास्ट चार्जरही देण्यात आला आहे. आयपी 69 पाणी आणि धूळ रोधक प्रमाणपत्र या फोनला मिळालेले आहे. 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा यामध्ये देण्यात आलेला असून 12 जीबी रॅमच्या फोनची किंमत 60000 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा फोन 57 हजार रुपयापर्यंत सवलतीत खरेदी करता येणार आहे. 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन कंपनीने 62 हजार 999 रुपयांना उपलब्ध केला आहे. 29 नोव्हेंबरपासून कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. 5800 एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनला असणार असून काही मिनिटातच हा फोन चार्ज होऊ शकणार आहे.

Advertisement

महत्त्वाची वैशिष्ट्यो...

  • 6.78 इंचाचा कर्व्हड डिस्प्ले
  • 120 डब्ल्यूचा अल्ट्रा फास्ट चार्जर
  • किंमत 60 हजाराच्या घरात
  • 5800 एमएएच क्षमतेची बॅटरी
  • 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा
Advertisement
Advertisement
Tags :

.