रियल माद्रीदचा निसटता विजय
वृत्तसंस्था / माद्रीद
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या अटितटीच्या सामन्यात रियल माद्रीदने व्हॅलेन्सियाचा 2-1 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रीद संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या सामन्यात ज्युडे बेलिंगहॅमने रियल माद्रीदचा दुसरा आणि निर्णायक गोल केला. मात्र बेलिंगहॅमने या सामन्यात पेनल्टीवर गोल नोंदविण्याची संधी गमविली होती. या सामन्यात रियल माद्रीद संघाला शेवटच्या काही कालावधीत 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. 27 व्या मिनिटाला मिस्टेलाने रियल माद्रीदचे खाते उघडले. 85 व्या मिनिटाला मोड्रीकने व्हेलेन्सियाला बरोबरी साधून दिली. या सामन्यातील विजयामुळे रियल माद्रीद संघाने 43 गुणासह पहिले स्थान मिळविले आहे. अॅटलेटिको माद्रीद 41 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. व्हॅलेन्सिया या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.