For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रियल लाइफ ‘वॅम्पायर वुमन’

06:45 AM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
रियल लाइफ ‘वॅम्पायर वुमन’
Advertisement

50 शस्त्रक्रिया करवून घेतल्यावर झाला विचित्र चेहरा

Advertisement

मेक्सिकोच्या एका महिलेला खऱ्या आयुष्यातील ‘वॅम्पायर वुमन’ म्हटले जाते. तिने एकेकाळी सर्वाधिक बॉडी मॉडिफिकेशन करविण्याचा विश्वविक्रम केला होता. या महिलेचे नाव मारिया जोस क्रिस्टना मेंडेज असून तिला वॅम्पायर वुमन या नावाने ओळखले जाते. घरगुती हिंसेतून सावरल्यावर विजयाचे प्रतीक म्हणून मारियाने सर्वप्रथम बॉडी मॉडिफाय करविले होते.

मारियाने वयाच्या 14 व्या वर्षी स्वत:चा पहिला टॅटू काढून घेतला होता आणि आता तिच्या शरीरावर एकूण 50 मॉडिफिकेशन आहेत आणि पूर्ण शरीर टॅटूंनी भरलेले आहे. जे लोक असे करू इच्छितात, त्यांनी चांगल्याप्रकारे विचार करूनच हे पाऊल उचलावे असे तिने म्हटले आहे.

Advertisement

मारियाने स्वत:च्या शरीराचा 99 टक्के हिस्सा टॅटूंनी झाकोळून टाकला अहे आणि तिच्या शरीरावर एकूण 50 मॉडिफिकेशन्स आहेत, यात माथा आणि हातांमध्ये इम्पालंट, पियर्सिंग आणि जीभेला दोन हिस्स्यांमध्ये विभागणे सामील आहे. तिने 2024 मध्ये एस्पेरेंस फ्यूरजिनामुळे स्वत:चा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड गमाविला होता.

अत्यंत विचारपूर्वक करा बॉडी मॉडिफिकेशन

मारियाला एकीकडे स्वत:चे टॅटू अत्यंत पसंत आहेत, परंतु ती बॉडी मॉडिफिकेशन अत्यंत विचारपूर्वक करा, कारण नंतर याला बदलता येत नसल्याचा इशारा युवांना दिला आहे. मला माझा लुक अत्यंत पसंत आहे, परंतु टॅटू आणि पियर्सिंग यासारख्या गोष्टींबद्दल अत्यंत खुल्या विचारांचे असणारे युवा देखील आहेत हे समजून घ्यावे लागेल असे तिने म्हटले आहे.

टॅटू आणि बॉडी मॉडिफिकेशन फॅशन ठरले आहे, याचमुळे आम्ही अशा टप्प्यावर पोहोचू शकतो, जेव्हा ही आमची इच्छा न राहण्याची किंवा याला पसंत न करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. याचमुळे याविषयी अत्यंत विचार करावा लागेल, जेणेकरून तुम्ही यावर प्रेम करू शकाल आणि जीवनभर याचा बचाव करू शकाल असे मारियाने युवांना उद्देशून सांगितले आहे.

मारिया नियमित स्वरुपात इन्स्टाग्रामवर स्वत:च्या 55 हजार फॉलोअर्ससाठी  अपडेट पोस्ट करत असते. हे फॉलोअर्स तिच्या लुकला पसंत करतात. माझे आरोग्य चांगले राहिले तर मी टॅटू काढून घेणे जारी ठेवणार असल्याचे ती सांगते.

एका अत्यंत धार्मिक परिवारातून येणाऱ्या मारियाने वयाच्या 30 व्या वर्षी स्वत:चे पहिले बॉडी इम्प्लांट मॉडिफिकेशन करविले होते. तेव्हा तिने ‘मुक्ती3श्च्या प्रतिकाच्या रुपात स्वत:च्या माथ्यावर एक इम्प्लांट लावले होते. हे घरगुती हिंसेतून ती सावरल्याचे दर्शविणारी खूण होती. घरगुती हिंसेतून वाचल्यावर माझ्या शरीरात करण्यात आलेले बदल साहस, शक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. हिंसा आणि गैरवर्तनातून वाचण्याची एकमात्र पद्धत म्हणजे स्वत:वर प्रेम करणे आहे. आम्ही या जगात आनंदी राहण्यासाठी आलो आहोत असे तिने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.