For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाहीर माफी मागण्यास तयार सर्वोच्च न्यायालयात

06:41 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
जाहीर माफी मागण्यास तयार सर्वोच्च न्यायालयात
Advertisement

पतंजलिच्या जाहिरातींबाबत सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पतंजलीच्या कथित भ्रामक जाहिरातींप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायाधीश हिमा कोहली आणि अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना तुमची अत्यंत मोठी प्रतिष्ठा असून तुम्ही खूप काही केले असल्याची टिप्पणी केली. तर बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी आम्ही सार्वजनिक माफी मागण्यास तयार आहोत, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यावरून गंभीर आहोत हे लोकांना कळावे असे नमूद केले याहे. यावर न्यायाधीश अमानुल्लाह यांनी याकरता तुम्हाला आमच्या सल्ल्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

Advertisement

न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधात जे तुम्ही केले ते योग्य आहे का अशी विचारणा न्यायाधीश कोहली यांनी बाबा रामदेव यांना केली. यावर बाबा रामदेव यांनी आमच्याकडुन चूक झाली असून याकरता आम्ही विनाशर्त माफी मागतो असे म्हटले आहे.

आमच्या देशात आयुर्वेद अत्यंत प्राचीन आहे, महर्षी चरक यांच्या काळापासून आहे. घरोघरी याचा वापर होतो. मग तुम्ही दुसऱ्या उपचारपद्धतींना वाईट का ठरवता? एकच उपचारपद्धती रहावी का अशी विचारणा खंडपीठाने केली. आम्ही आयुर्वेदावर मोठे संशोधन केले असल्याचे उत्तर बाबा रामदेव यांनी यावर दिले. आम्हाला कायद्याचे ज्ञान कमीच आहे. आम्ही केवळ आमच्या संशोधनाची माहिती लोकांना देत होतो. न्यायालयाच्या अवहेलनेचा उद्देश नव्हता असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

तुम्ही चांगले काम करताय...

अॅलोपॅथीला वाईट ठरविण्याची गरज नव्हती. तुम्ही चांगले काम करत आहात, ते करत रहा. इतरांबद्दल बोलणे टाळा असे न्यायाधीश अमानुल्लाह यांनी बाबा रामदेव यांना सांगितले. यावर बाबा रामदेव यांनी अॅलोपथी आणि आयुर्वेदाचा संघर्ष जुना असल्याचे म्हणत भविष्यात आम्ही अशी चूक करणार नसल्याची भूमिका मांडली.

पुढील सुनावणी 23 एप्रिलला

1 आठवड्याचा कालावधी देण्यात यावा, यादरम्यान आम्ही आवश्यक पावले उचलणार आहोत असे बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचे वकील रोहतगी यांनी सुनावणीदरम्यान म्हटले. यावर खंडपीठाने 23 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे म्हणत अवमानाच्या आरोपींनी स्वत:च काही पावले उचलणार असल्याचे सांगितल्याने आम्ही याची संधी देत आहोत असे नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.