कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतासाठी काहीही करण्यास तयार

06:20 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेने पाकिस्तानला दिला स्पष्ट संदेश

Advertisement

अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी भारताला अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदार संबोधिले आहे. दहशतवाद विरोधातील लढाईत भारताला पूर्ण सहकार्य केले जाणार आहे.  भारत आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण साथीदार असून त्याचे समर्थन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे जॉन्सन यांनी कॅपिटल हिलमध्ये काँग्रेसच्या ब्रीफिंगदरम्यान म्हटले आहे. माइक जॉन्सन यांनी केलेले वक्तव्य भारत-अमेरिकेच्या कूटनीतिक संबंधांना नवी मजबुती देणारे आहे. माइक जॉन्सन यांनी स्वत:च्या भाषणात भारत-अमेरिका व्यापार चर्चेचाही उल्लेख केला.

Advertisement

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने त्वरित प्रतिक्रिया देत भारताला समर्थन जाहीर केले होते. 23 एप्रिल रोजी अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा करत हल्ल्यातील पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केल्या होत्या. भारत आणि अमेरिका दहशतवाद विरोधी लढाईत एकत्र आहेत. हा एक क्रूर हल्ला होता आणि याच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी असे ट्रम्प यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये नमूद केले होते.  30 एप्रिल रोजी अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को  रुबियो यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवाद विरोधातील सहकार्याचा पुनरुच्चार केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article