For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहलक्ष्मी योजनेच्या फेरतपासणीला सुरुवात

06:18 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
गृहलक्ष्मी योजनेच्या फेरतपासणीला सुरुवात
Advertisement

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे दिली जबाबदारी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

गृहलक्ष्मी योजनेच्या फेरतपासणीला शहरासह ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. घरोघरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची झेरॉक्स प्रत घेतली जात आहे. एसआयआरचे काम संपताच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या कामावर जुंपण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे.

Advertisement

योजनेच्या फेरतपासणीसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक अथवा पोस्ट पासबूक, गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर देण्यात आलेली ऑर्डर कॉपी ही सर्व कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. ग्रामीण भागात आठवडाभरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. तर शहरी भागात मागील दोन दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली आहे.

फेरतपासणी केव्हा होणार याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज होते. काही ऑनलाईन सेंटर चालकांनी याचा गैरफायदा घेत नको असलेली प्रमाणपत्रे नागरिकांच्या माथी मारली. 10 ते 100 रुपये उकळून जीवन प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे सरकारकडून नेमकी केव्हा फेरतपासणी होणार याबाबतची साशंकता होती. अखेर याला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

घरोघरी जाऊन कागदपत्रांची तपासणी : मंदा नेवगी (अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी)

गृहलक्ष्मी योजनेच्या फेरतपासणीचे काम मागील आठवडाभरापासून सुरू झाले आहे. घरोघरी जाऊन महिलांकडून कागदपत्रांची झेरॉक्स घ्यावी लागत आहेत. तसेच मृत व्यक्तींची माहितीही द्यावी लागणार आहे.

Advertisement
Tags :

.