हनुमंताच्या मूर्तीची पुनः प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
धाराशिव/ उमरगा :
उमरगा शहरातील जुनीपेठ मधील श्री हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जुन्या काळी उमरगा शहराच्या वेशीवरील हनुमान मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. शहरातील अनेक धार्मिक कार्यक्रमात हनुमान मंदिराला मानाचे स्थान आहे.
या मंदिराच्या जुर्णोद्धारास आमदार निधीतून व जुनी पेठ व शहरातील लोकांच्या लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनीय भागात अनेक धार्मिक चित्रांचे रेखाटन केले आहे.
उमरगा शहरात हनुमान मंदिरापासून ते महादेव मंदिरापर्यंत महिलांची कलश मिरवणूक निघणार आहे. विविध प्रसिध्द कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.