इस्लामपूर–नाईकबा रस्त्यावरील आर.सी.सी. गटर कामाला सुरुवात !
आष्टा शहरातील आर.सी.सी. गटर बांधकामाचा शुभारंभ
आष्टा : शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत इस्लामपूर रस्ता ते नाईकबा रस्ता या भागातील आर.सी.सी. गटर बांधकामाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
एकूण १२ लाख ९५ हजार रुपये खर्चाच्या या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ ता, पावसाळ्यातील पाणी निचरा आणि आरोग्यदायी वातावरण याचा मोठा लाभ होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून व निशिकांत भोसले-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच प्रवीण माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम शक्य झाले आहे.
त्यांच्या पुढाकारामुळे आष्टा शहरातील विकासाला सातत्यपूर्ण गती मिळत आहे. प्रवीण माने म्हणाले, आष्टा शहर आणि विकास याची अविरत साथ हीथ आमची भूमिका आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधा, पायाभूत सुविधा आणि प्रगती ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कृतीतून दिसणारी वास्तवता आहे.
आष्टा शहराचे भविष्य समृद्ध, आधुनिक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी विका विकासाची दिशा लोकांसमोर मांडली. या आर.सी.सी. गटर बांधकामामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली स्थानिकांची गरज पूर्ण होत आहे. पावसाळ्यात पाणी साचण्यावर कायमस्वरूपी उपाय होणार आहे.
यावेळी संदीप गायकवाड, संजय सावंत, इमरान देवळे, विकास खंबाळे, अरबाज मुजावर, वसीम नायकवडी, शैलेश पितळे, संदीप मंडले, शिवप्रसाद भोसले, वैभव पांढरे, सूरज बाघमारे, प्रथमेश मंडले, महेश माळी, संतोष लोंढे उपस्थित होते.