‘आरसीबी’चा मुकाबला आज दिल्ली कॅपिटल्सशी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयपीएलमध्ये आज गुऊवारी होणाऱ्या सामन्यात बेधडक रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक मनोरंजक लढत रंगणार आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंमध्येही यावेळी लढत पाहायला मिळणार आहे. कॅपिटल्सने तीन सामन्यांमधून तीन विजय मिळवले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्सने चार सामन्यांमधून तीन विजय मिळवले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने कोलकाता, चेन्नई आणि मुंबईसारख्या वेगवेगळ्या परिस्थितीत वर्चस्व गाजविलेले आहे आणि त्यांचा एकमेव पराभव हा गुजरात टायटन्सविऊद्ध घरच्या भूमीवर झाला. त्यावेळी चिन्नास्वामीच्या खेळपट्टीने त्यांना आश्चर्यचकीत केले. विशाखापट्टणम व चेन्नईतील वेगवेगळ्या धाटणीच्या खेळपट्ट्यांवर विजय मिळविलेल्या दिल्ली संघाविऊद्धच्या लढताना यजमान संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल. कारण स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर मिळविलेला आहे. जर येथील खेळपट्टीचे स्वरुप गुजरतविरुद्धच्या त्या सामन्याप्रमाणे राहिले, तर कोहलीचा फॉर्म आरसीबीसाठी महत्त्वाचा ठरेल.
36 वर्षीय विराट कोहलीला या सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचे आव्हान पेलावे लागेल. कोहलीने ‘टी-20’मध्ये स्टार्कविरुद्ध 31 चेंडूंत 72 धावा काढलेल्या आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडूही या हंगामात चांगल्या स्थितीत असून त्याने तीन सामन्यांत 11 च्या सरासरीने नऊ बळी घेतले आहेत. पॉवर प्लेमध्ये स्टार्क विऊद्ध कोहली ही लढाई आरसीबीच्या सुऊवातीच्या गोलंदाजीवर मोठा प्रभाव पाडेल. जर कोहली अधिक वेळ टिकून राहिला, तर त्याला कुलदीपचा (6 च्या इकोनॉमी रेटने 6 बळी) सामना करावा लागेल आणि ही एक रंजक लढाई ठरेल.
येथे फॉर्ममध्ये असलेला आरसीबी कर्णधार रजत पाटीदारलाही मोठी भूमिका बजवावी लागेल. कारण तो फिरकीचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. दिल्लीला कर्णधार व डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलकडून मोठ्या योगदानाची अपेक्षा असेल. दिल्लीच्या कर्णधाराने तीन सामन्यांमध्ये फक्त आठ षटके गोलंदाजी केली आहे आणि अद्याप एकही बळी घेतलेला नाही. आरसीबीचा विचार करता त्यांचे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर नियंत्रण मिळवून दिलेले आहे. दिल्लीविऊद्ध त्यांना पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. खास करून येथील परिस्थितीशी पूर्णपणे परिचित असलेल्या के. एल. राहुलला रोखण्याचे काम त्यांना करावे लागेल. राहुल आता क्रीझवर जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तो अधिक धोकादायक बनला आहे.
दिल्लीचा संघ चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या मागील सामन्यात खेळू न शकलेल्या फाफ डु प्लेसिसच्या फिटनेसवरही बारकाईने लक्ष ठेवून असेल. डु प्लेसिस येथील परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती असलेला आणखी एक खेळाडू असून तो राहुलसोबत मैदानात उतरला, तर आरसीबीच्या नवीन चेंडू हाताळणाऱ्या गोलंदाजांसमोरील आव्हान आणखी खडतर होईल.
संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, कऊण नायर, डोनोवन फेरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नळकांडे, दुष्मंथा चमीरा, के. एल. राहुल, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल., माधव तिवारी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.