आरसीबी-पंजाब अंतिम सामन्यात डिजिटल प्रेक्षकसंख्येचा नवा विक्रम
स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक 67.8 कोटी प्रेक्षकांनी पाहिलेला सामना
वृत्तसंस्था/अहमदाबाद
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने अखेर त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली, या सामन्यात व्ह्यूअरशिपचा नवा विक्रम नोंदला गेला. स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक प्रेक्षकानी पाहिलेला हा सामना बनला. आयपीएल 2025 ने आरसीबीला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिले. या सामन्यादरम्यान अभूतपूर्व डिजिटल संवादाचे स्तर उघड झाले आहे. यामध्ये आरसीबीच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असलेल्या विराट कोहली त्यांच्या बहुप्रतिक्षित विजयाने अंतिम सामन्याला भावनिक धार मिळाली. 2008 पासून फ्रँचायझीचा चेहरा असलेल्या कोहलीने सामन्याची लोकप्रियता वातावरणीय पातळीवर आणण्यास हातभार लावला.
अ ाारसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज (पीबीकेएस) यांच्यातील अंतिम सामना सुरू झाला तेव्हा 4.3 कोटी ह्यूज मिळाले, 11 व्या षटकापर्यंत ही संख्या 11 कोटींहून अधिकवर पोहोचली. कोहली 43 धावांवर बाद झाला तेव्हा ह्यूज संख्या 26.5 कोटींवर पोहोचली. जितेश शर्माने आरसीबीवर प्रतिहल्ला केला तेव्हा 30 कोटींहून अधिक ह्यूज मिळवले. आरसीबीच्या 20 व्या षटकापर्यंत एकूण 34.7 कोटींवर पोहोचले. आरसीबीने त्यांचा डाव 190 धावांवर संपवला आणि प्रेक्षकसंख्या 35 कोटींवर पोहोचली. पंजाब किंग्जने पाठलाग करताना जेव्हा कृणाल पंड्याने सुरुवातीच्या टप्प्यात प्रभसिमरन सिंगला बाद केले तेव्हा व्ह्यूअर्सची संख्यने नाट्यामय वळण घेतले आणि काही क्षणातच ह्यूज 50 कोटींवर पोहोचले. 14 व्या षटकापर्यंत 55 कोटी ह्यूज मिळाले आणि आरसीबी जिंकेपर्यंत, प्रेक्षकांची संख्या विक्रमी 67.8 कोटीवर पोहोचली होती.
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचे डिजिटल वर्चस्व
आयपीएल 2025 ने सुरुवातीपासूनच विक्रम मोडले सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी 4,956 कोटी मिनिटांचा एकत्रित वेळ पाहिला गेला. फक्त पहिल्या तीन सामन्यांना 137 कोटी ह्यूज मिळाले होते. मागील हंगामाच्या तुलनेत, डिजिटल ह्यूअरशिपमध्ये 40 टक्के वाढ झाली, ज्यातून आयपीएलची खूप वेगाने वाढ होताना दिसत आहे.