For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरबीआयची आजपासून द्वैमासिक बैठक

06:31 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरबीआयची आजपासून द्वैमासिक बैठक
Advertisement

रेपो दरात बदल होण्याची शक्यता अंधुक

Advertisement

► वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मौद्रिक धोरण समितीची (एमपीसी) बैठक 6 ते 8 एप्रिल दरम्यान होणार आहे. या खेपेस व्याजदरात काहीसा दिलासा मिळेल अशी बाजाराला आशा होती, परंतु पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तूर्तास परिस्थिती बदलली आहे.

Advertisement

एसबीआय रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ लक्षात घेता आरबीआय सध्या रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीतही व्याजदरात कोणताही बदल झाला नव्हता. सध्याचा रेपोरेट 5.25 टक्के आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे 1973 नंतर जागतिक तेल बाजारात सर्वात मोठा व्यत्यय आला आहे.

युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा पहिलाच धोरण आढावा असल्यामुळे आरबीआय अत्यंत सावधगिरीने पुढे जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने घेतलेल्या निर्णयांची घोषणा बुधवार, 8 एप्रिल रोजी होणार आहे. नव्या आर्थिक वर्षातील ही पहिली द्वैमासिक बैठक असल्यामुळे देशवासियांची नजर या बैठकीकडे असणार आहे.

Advertisement
Tags :

.