For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रावतच्या शतकाने इंडिया अ ला सावरले

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
रावतच्या शतकाने इंडिया अ ला सावरले
Advertisement

वृत्तसंस्था/अनंतपूर

Advertisement

शाश्वत रावतच्या नाबाद शतकाच्या जोरावर गुरुवार येथे सुरू झालेल्या 2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंडिया अ संघाने पहिल्या डावात 7 बाद 224 धावांपर्यंत मजल मारली. इंडिया क च्या कंबोज आणि विशाख यांची प्रभावी गोलंदाजी झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया क च्या भेदक गोलंदाजी समोर इंडिया अ ची फलंदाजी सुरूवातीला कोलमडली. शतकवीर शाश्वत रावतला मुलानीकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. इंडिया अ ची एकवेळी स्थिती 5 बाद 36 अशी 20 षटकाखेर केविलवाणी होती. त्यानंतर रावतच्या शतकाने इंडिया अ चा डाव चांगलाच सावरला. इंडिया अ चा कर्णधार मयांक अगरवाल, तिलक वर्मा आणि रियान पराग हे दुहेरी धाव संख्या गाठण्यापूर्वीच बाद झाले. रावतने 235 चेंडूत 15 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 122 धावा जमविल्या. मुलानी आणि रावत याने सहाव्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. अष्टपैलु मुलानीने एकेरी धावावर अधिक भर देत 76 चेंडूत 44 धावा जमविल्या. इंडिया अ ची मधली फळी कंबोज आणि विशाख यांच्या गोलंदाजीसमोर ढेपाळली. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंडिया क सध्या 9 गुणासह आघाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक: इंडिया अ 77 षटकात 7 बाद 224 शाश्वत रावत खेळत आहे 122, मुलानी 44, कंबोज 3-40, विशाख 2-33)

Advertisement

Advertisement
Tags :

.