कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी येथील भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ प्रथम

04:39 PM Sep 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कलंबिस्तचे स्वामी समर्थ भजन मंडळ द्वितीय तर नेरुरचे मोरेश्वर भजन मंडळ तृतीय

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळीच्या श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ( बुवा रूपेश यमकर ) याने प्रथम क्रमांक पटकाविला. या भजन स्पर्धेत कलंबिस्तच्या श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ ( बुवा संतोष धर्णे ) द्वितीय क्रमांक तर नेरुरच्या श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ ( बुवा भार्गव गावडे) तृतीय क्रमांक पटकाविला. भजन स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ घोडगे( बुवा हर्षद ढवळ), उत्कृष्ट गायक - रूपेश यमकर, उत्कृष्ट पखवाज - विशाल कोंडुरकर, उत्कृष्ट तबला अमन सातार्डेकर, सर्व श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ (पिंगुळी), उत्कृष्ट हार्मोनियम प्रसाद आमडोसकर श्री देव महापुरुष प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी, उत्कृष्ट कोरस - विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ (आंदुर्ले) उत्कृष्ट झांजवादक - कु ऐश्वर्या चव्हाण श्री राम कृष्ण हरी महिला सेवा संघ (तेंडोली).या भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी परीक्षक योगेश प्रभू anirआनंद मोर्ये, मंडळाचे दीपक केसरकर, मंगेश उर्फ बाबू इन्सुलकर, शैलेश मेस्त्री, अर्चित पोकळे, दिलीप राऊळ, उमेश माने, संतोष मुंज, श्रीपाद चोडणकर, वैभव म्हापसेकर, शैलेश गौंडळकर, ईनास माडतीस, आनंद आयरे, नंदू गावकर, मयूर सुभेदार, विशाल वाडकर, अमित वेतुरकर, मुन्ना नेमळेकर, राजू मोरे, प्रसाद वागळे, ऋषिकेश भांबुरे आदी उपस्थित होते.यावेळी प्रथम तीन क्रमांकांना ९००० रुपये (बाबू इन्सुलकर पुरस्कृत), द्वितीय ७००० रूपये (वैभव म्हापसेकर पुरस्कृत ), तृतीय ५००० रूपये (वैभव म्हापसेकर पुरस्कृत ), उत्तेजनार्थ ३५०० रूपये (हेमंत रंकाळे पुरस्कृत), स्पर्धेतील उकृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादकयांना रोख रकमेसह आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. या भजन स्पर्धेसाठी चषक मनोज सावंत अमोल मुंज संतोष मुंज अतुल पेंढारकर यांनी पुरस्कृत केले होते.या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले होते. या भजन स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला परीक्षक म्हणून योगेश प्रभू आणि आनंद मोर्ये यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article