महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काळसेचा रविराज नार्वेकर ठरला सिंधुदुर्गातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट

04:24 PM Jan 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

चेन्नईतील अमेट युनिव्हर्सिटी मधून पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण

Advertisement

मालवण : प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुक्यातील काळसे - बागवाडी गावचा सुपुत्र रविराज शंकर नार्वेकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट ठरला आहे. रविराज याने चेन्नई मधील अमेट युनिव्हर्सिटी मधून ही पदवी प्राप्त केली आहे. रविराज हा बंदर विभागाचे कर्मचारी शंकर उर्फ भाऊ नार्वेकर आणि सर्व शिक्षा अभियानच्या तज्ञ शिक्षिका सौ. गौरी नार्वेकर यांचा सुपुत्र आहे.

रविराज याने कुडाळ हायस्कुलच्या इंग्लिश मिडीयम स्कुल मधून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेव्हल आर्किटेक्टचे शिक्षण चेन्नई येथील अमेट युनिव्हर्सिटीच्या ऍकेडमी ऑफ मरीन एज्यूकेशन अँड ट्रेनिंगमध्ये घेतले. याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून रविराज हा नेव्हल आर्किटेक्ट परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. हे शिक्षण घेणारा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला विदयार्थी ठरला आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या हस्ते रविराज नार्वेकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # malvan # kalse # Naval Architect
Next Article