For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रवींद्र जडेजाने मलिंगाला टाकले मागे

06:16 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
रवींद्र जडेजाने मलिंगाला टाकले मागे
Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने लंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळविणारा तो नवव्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

त्याचा माजी संघ चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळताना त्याने हा माईलस्टोन गाठला. या सामन्यात जडेजाने शिवम दुबे व सर्फराज खान यांची बळी मिळविले. त्याचे आता 255 सामन्यात 30.26 च्या सरासरीने 172 बळी झाले आहेत त्याने एका पाच बळींही मिळविले आहेत. मलिंगाने 170 बळी मिळविले आहेत. 2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिविले होते, जडेजा त्या संघाचा भाग होता. त्यानंतर 2012 मध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सचा खेळाडू झाला.

Advertisement

2018, 2021, 2023 यावर्षी सीएसकेने विजेतेपद मिळविला होते आणि जडेजा त्या विजेत्या संघांचा सदस्य होता. या जेतेपदांमध्ये जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण या सर्वच विभागात भरीव योगदान दिले होते. तो आता पुन्हा आरआरमध्ये सामील झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारे गोलंदाज

गोलंदाज              सामने         बळी

युजवेंद्र चहल         174             221

भुवनेश्वर कुमार      191           199

सुनील नरेन           190          193

पीयूष चावला          192         192

आर. अश्विन             221       187

जसप्रीत बुमराह     146        183

ड्वेन ब्राव्हो             161      183

अमित मिश्रा           162       174

रवींद्र जडेजा          255       172

लसिथ मलिंगा        122       170

Advertisement
Tags :

.