कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक कमळा शिवाय होऊ देऊ नका

02:46 PM Jan 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

भाजपला खिंडार पडल्यावर राज्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बांद्यात वक्तव्य

Advertisement

मयुर चराटकर
बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला खिंडार पडुन एक दिवस व्हायच्या आतच भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या नियोजित दौऱ्यातून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक कमळाशिवाय होऊ देऊ नका असे सूचक वक्तव्य केले. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिक्षत भाजपा असली पाहिजे असे आवाहन त्यानी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. त्यासाठी मी जसा पूर्वी आपल्या सोबत होतो त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपल्या सोबत असेन त्यामुळे कोणीही चिंता करू नका. घोडमैदान फार जवळ आहे आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर ज्याप्रमाणे लोकसभा, विधानसभेत कोकणात यश मिळाले त्याच प्रमाणे येणाऱ्या निवडणुका मध्ये केवळ कमळच जिंकून येईल असे मी आपल्यावतीने बोलतो.
भाजप एक विचारधारा असून त्या मध्ये कधी कोणी एक म्हणजे पक्ष नाही पक्ष तिथेच असतो पदावरील माणसे फक्त बदलत असतात. त्यामुळे या पक्षात कोणी दादा किंवा भाई आगेबढो अशा घोषणा न देता केवळ भारतीय जनता पार्टी आगे बढो अशा घोषणा दिल्या पाहिजेत. कालच शिवसेना शिंदे गटामध्ये कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील भाजपच्या 18 सरपंच, 12शक्ती केंद्रप्रमुख व 55 बूथप्रमुखांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आजच्या माजी पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याकडे सगळ्याचे लक्ष होते.भाजपाचे महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते यावेळी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने बांदा येथे त्याचे जंगी स्वागत केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, रवि मडगांवकर, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, प्रियांका गावडे, गुरुनाथ पेडणेकर, संदीप मेस्त्री, मनोज नाईक, महेश सारंग, मंदार कल्याणकर, महेश धुरी, जावेद खतीब, बाळू सावंत आदी सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # ravindra chavan # konkan update
Next Article