For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंज’ चित्रपटात दिसणार रवि मोहन

06:28 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंज’ चित्रपटात दिसणार रवि मोहन
Advertisement

बक्कियराज कन्नन करणार दिग्दर्शन

Advertisement

तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवि मोहन दिग्दर्शन कनगराज यांच्या प्रसिद्ध ‘लोकेश सिनेमॅटिक यूनिव्हर्स’चा हिस्सा झाला आहे. रवि मोहन आगामी चित्रपट ‘बेंज’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत निविन पॉली आणि राघव लॉरेन्स देखील मुख्य भूमिकेत आहे.

लोकेश कनगराजने एक्सवर रवि मोहनची बेंज चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या चित्रपटाची कहाणी बक्कियाराज कन्नन यांनी लिहिली असून तेच दिग्दर्शन करत आहेत. तर लोकेश कनगराज याचा निर्माता आहे. चित्रपटाला संगीत साई अभ्यंकरने दिले आहे. रवि मोहन यापूर्वी ‘पराशक्ती’ चित्रपटात दिसून आला होता.

Advertisement

रवि मोहन सध्या खासगी आयुष्य आणि घटस्फोटाच्या वादावरून चर्चेत आहे. रवि मोहनने स्वत:ची पत्नी आणि तिच्या परिवारावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. पत्नीने विवाहावेळी हाताची नस कापून घेत ब्लॅकमेल पेले होते. विवाहानंतर मला एका ठराविक प्रॉडक्शन हाउसच्या बाहेर काम करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मी इतकी वर्षे याप्रकरणी गप्प बसलो हा माझा मूर्खपणाच होता असा दावा रवि मोहनने केला आहे.

Advertisement

.