रवि किशन यांचे नवे गाणे प्रदर्शित
अभिनेता रवि किशनने स्वत:चे नवे गाणे ‘मनी फॉलोज माय ब्रदर’ जारी केले आहे. हे गाणे रवि किशन यांच्यावरच चित्रित करण्यात आले असून त्यांचाच आवाज गाण्याला लाभला आहे. हे गाणे मेलो डी, सुरजीत बिंद्राखिया आणि रवि किशन यांनी मिळून तयार केले आहे. गीतलेखन मेलो डी आणि शमशेर संधू यांनी केले आहे.
या गीताला संगीत मेलो डी, संगम विज्ञानिक आणि अतुल शर्मा यांनी मिळून दिले आहे. या गाण्याची सुरुवात रवि यांच्या बालपणीच्या झलकद्वारे होते. कारमध्ये बसलेल्या मुलाला त्याची आई अभ्यासात मन लागत नसेल तर काय करणार असा प्रश्न विचारले. याच्या उत्तरादाखलतो मुलगा ‘पूर्ण देशाला वेड लावेन’ असे म्हणतो आणि यानंतर हे गाणे सुरु होते, ज्यात रवि किशन दिसून येतात. रवि किशन यांचा एक डायलॉग काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. एका शोमध्ये गेस्टच्या स्वरुपात पोहोचलेल्या रवि किशन यांनी मनी फॉलोज माय ब्रदर, मनी फॉलोज असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले होते. अभिनेत्याचा हा संवाद सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. आता रवि यांनी यावर गाणे तयार करत ते प्रदर्शित केले आहे.