For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rautwadi Waterfall: अतिउत्साहीपणा नडला, राऊतवाडी धबधब्यातून तरुण वाहून गेला अन्...

11:24 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
rautwadi waterfall  अतिउत्साहीपणा नडला  राऊतवाडी धबधब्यातून तरुण वाहून गेला अन्
Advertisement

अतिउत्साही पर्यटकांमुळे धबधब्यांच्या ठिकाणी अपघात पाहायला मिळतात

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले असून काही अतिउत्साही पर्यटकांमुळे धबधब्यांच्या ठिकाणी अपघात घडताना पाहायला मिळत आहेत.

राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे एक पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. तो वाहून जात असताना दैव बलवत्तर म्हणून आणि पर्यटकांच्या कार्यतत्परतेमुळे तरुण बचावला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले असून धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून यामुळे येथील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे.

या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून प्रवाह जास्त आहे. धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येथे गर्दी करतात. काहीजण धबधब्यात उतरून हुल्लडबाजी करताना दिसतात. काल या धबधब्यात एक पर्यटक सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला आणि पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहून जाऊ लागला.

यावेळी काही पर्यटक त्वरित मदतीसाठी पुढे सरसावले. मात्र पाण्याला प्रवाह असल्याने आणि बचावासाठी कोणतेही यंत्रसामग्री नसल्याने वाहून जाणाऱ्या व्यक्तीस बचाव करण्यास अडचणी निर्माण झाल्या. दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांसाठी मोठ्या मुश्किलीने वाहून जाणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र ज्या मोबाईलमध्ये तो सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला होता तो मोबाईल वाहून गेला. धबधब्यांना प्रवाह जास्त असल्याने पर्यटकांनी स्वतःचा जीव सांभाळून पर्यटन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.