कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : शहरालगतच्या गावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पाच घरे फोडली

06:18 PM Apr 24, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

उन्हाळी सुट्टयांमध्ये अनेकजण बाहेरगावी जात असल्याने चोरीच्या घटना घडतात

Advertisement

रत्नागिरी : शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडून लाखो ऊपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार, 21 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई यांचे कुटुंब सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहे.

Advertisement

मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अन्य तीन घरेही फोडल्याचे निदर्शनास आले. तसेच खेडशीजवळील फणसवळे येथेही भिकाजी माने यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले माने कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असून, त्यांच्या अनुपस्थितीत घर फोडले गेले. ही बाबही शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामीण पोलिसांना सूचित करण्यात आले.

पोलिसांनी दोन्ही ठिकाणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाहीअलीकडेच बनावट पोलिस बनून दोन महिलांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता पाच घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये अनेक जण बाहेरगावी जात असल्याने चोरीच्या घटना या काळात सातत्याने घडत असल्याचे पहावयास मिळत़े दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Tags :
_police_action@ratnagiri#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime newskonkan news
Next Article