मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात! ३ ठार तर ८ जखमी
रायगड दि. ११ मे / प्रतिनिधी
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातामध्ये ३ ठार ९ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी ( दि.१० ) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून पुण्याहून मुंबईकडे बोर घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, व समोरून येणाऱ्या कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोला जोराने धडक दिली, याचवेळी ट्रकने कारला देखील धडक दिली. कारला धडक बसल्याने कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ट्रक मधील एकाचा मृत्यू झाला. तसेच ३ जण जखमी झाले आहेत. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधील दोन जण गंभीर जखमी तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे . सर्व जखमींना खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर किरकोळ उपचार करण्यात आल्यानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावे सुदाम धुळा गोरड , (५५) आणि निर्मला सुदाम गोरड ( ५०) रा. गटेवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा अशी आहेत. टेम्पो चालक जाफर अली मोहम्मद रईस हा देखील मृत्यू झाला असून त्याच्याबरोबर असलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती समजतात बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस आय आर बी कडील देवदूत टीम पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, डेल्टा फोर्स, घटनास्थळी दाखल झाली . अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती परंतु अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.