For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News: संगमेश्वरचा 'हा' मार्ग मृत्यूचा सापळा? ग्रामस्थांत तीव्र संताप

05:10 PM May 09, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news  संगमेश्वरचा  हा  मार्ग मृत्यूचा सापळा  ग्रामस्थांत तीव्र संताप
Advertisement
अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? नागरिकांमधून सवाल
संगमेश्वर: तालुक्यातील मेढे तर्फे फुणगूस राई-भातगाव मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत भयावह बनत चालली आहे. प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथील ग्रामस्थांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, हा मार्ग आता अपघातांना खुले आमंत्रण देत आहे.
Advertisement

मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून लाल माती पसरल्याने दुचाकीस्वारांचे हाल बेहाल होत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पसरलेल्या लाल मातीमुळे वाहने घसरत असून अनेक चालक थोडक्यात बचावले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना रस्ता पूर्णपणे चिखलमय होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रखडलेले काम आणि रस्त्यावरील चिखल यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. "एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

आंदोलन आणि उपोषणाचा इशारा
ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि उपोषणाला बसण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.