हाफ मॅरेथॉनमध्ये धावले रत्नागिरीकर !
रत्नागिरी
रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
आपल्या आरोग्याबाबतीत नेहमीच सजग असणाऱ्या रत्नागिरीकरांनी यावेळी फिट राहण्याचा संदेश या मॅरथॉनमधून दिला. २१ कि. मी. पुरुषांमध्ये झालेल्या स्पर्धेत अभिषेक देवकाते व महिलांमध्ये रजनी सिंग यांनी बाजी मारली. तब्बल १,६०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ कि.मी. धावण्याच्या या स्पर्धेत भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
रविवारी सकाळी मथुरा हॉटेलजवळील मैदानावर झुंबा डान्सने स्पर्धकांचे वॉर्मअप घेण्यात आले. गुलाबी थंडीच्या वातावरणात धावपटूंचा उत्साह कौतुकास्पद होता. रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा सुवर्णदुर्ग फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित केली होती. स्पर्धेच्या मार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावदूतांचे आगळेवेगळे जल्लोषात स्वागत केले. अमेरिका, इंग्लंड
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, माजी नगरसेवक बाळू साळवी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक सूर्यकांत देवस्थळी व सुवर्णा देवस्थळी आणि अध्यक्ष प्रसाद देवस्थळी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला.
देशासह भारतातील ८५ शहरांतून १,६०० जणांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाट्ये बीच येथे स्पर्धेची सांगता झाली. चढावाच्या मार्गावरून धावताना धावपटूंची मेहनत दिसून आली. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायत व अनबॉक्सने हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली होती.