For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीकरांनी अनुभवला कुस्तीचा थरार!

05:02 PM Jan 13, 2025 IST | Pooja Marathe
रत्नागिरीकरांनी अनुभवला कुस्तीचा थरार
Advertisement

रत्नागिरी
शहरवासियांनी देशातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवला रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्टस् असोसिएशन आयोजित लाल मातीतील कुस्त्यांच्या मैदानात सर्व पैलवानांनी मैदान गाजवले. महाराष्ट्राचा पै सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा भोला सिंग यांच्यात चुरशीची लढत झाली. सिकंदरने भोला सिंग याला अवघ्या २० सेकंदात फ्रंट साल्तो डावावर आसमान दाखवत मानाचा रत्नागिरी सामंत केसरी किताब पटकावला.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीत देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महास्पर्धा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. देशातील नावाजलेल्या कुस्तीपटूंसह १८ महिला कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शुक्रवारी या स्पर्धाचा शुभारंभ झाला यावेळी कुस्त्यांचा लहान पैलवानांनी मैदानात थरार कसा असतो हे दाखवून दिले. विश्वास हारुगले यांचा पठ्ठा गंगावेश
तालीम, महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध भोला सिंग, दुसरी लढत महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे विरुद्ध पै जयदिप सिंग यांच्यात झाली. या लढतीत माऊली जमदाडे विजयी झाला तर तिसरी लढत पै. वेताळ शेळके विरुद्ध बंटी कुमार यांच्यात झाली. या लढतीत वेताळ शेळके विजयी झाले. चौथी लढत पै. सागर काळेबाग विरुद्ध पै. प्रदीप ठाकूर यांच्यात चुरशीची लढत झाली. पाचवी लढत पै. सोहेल शेख
विरुद्ध पै. विनोद दठी यांच्यात रंगली. सहावी लढत पै. प्रवीण पाटील विरूद्ध अतुल हिरवे यांच्यात रंगली. तर सातवी कुस्ती श्रीवर्धन पाटील विरद्ध पै सागर नाईक यांच्यात झाली या कुस्त्यांच्या सामन्यावेळी प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
८० ते ८५ किलो वजनी गटात पहिली लढत पै. बापू टिळे विरुद्ध चौगुले यांच्यात झाली. तर दुसरी लढत पै. समर्थ पाटील विरुद्ध पै. सोहेल शेख यांच्यात झाली. त्या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या कुस्त्यांनी लक्ष वेधून घेतले. महिलांच्या कुस्त्यांमध्ये पहिली लढत पै. पल्लवी जाधव विरुद्ध पे. नूतन शर्मा यांच्यात्त पार पडली. दुसरी लढत पै. सिद्धी पाटील विरुद्ध पै. श्रुती चौगुले यांच्यात तर तिसरी लढत पै. श्रुती कांबळे विरुद्ध पै. तन्वी कुमार यांच्यात झाली. चौथी लढत पै राजनंदिनी नागावे विरुद्ध पै. सावली कांबळे यांच्यात झाली. पाचवी लढत पै. आरोही चव्हाण विरुद्ध पै. जिया हजारे यांच्यात झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.