For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Crime News: राजापुरात २ लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह 'इनोव्हा' जप्त

06:11 PM May 10, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri crime news  राजापुरात २ लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह  इनोव्हा  जप्त
Advertisement
७ लाखांची कार आणि मद्यसाठा जप्त

रत्नागिरी: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी भरारी पथकाने राजापूर तालुक्यात अवैध मद्यविक्री आणि गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शुक्रवारी साखरतर वाडी येथे केलेल्या कारवाईत एका 'इन्व्होव्हा' कारमधून २ लाख ८ हजार ३२० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

नेमकी कारवाई काय?
राजापूर मद्य परवाना धारकांनी महाराष्ट्र दिनी गोवा बनावटीच्या बनावट दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. या निवेदनाला उत्तर देताना अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी अधिक जोमाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासणी सुरू केली. शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राजापुरातील साखरकरवाडी येथे उभ्या असलेल्या इनोव्हा कारमध्ये गोवा बनावटीचे मद्य असल्याची टीप पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने धाड टाकली.

इनोव्हा कारची तपासणी केली असता आतमध्ये हायवर्ड, हनी, मॅकडॉवेल नं. १, रिसर्व्ह ७, व्हिस्कीच्या बॉक्ससह दोन बडवायझर आणि किंगफिशरचे बॉक्स मिळून आले. या कारचा मालक शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मद्याच्या बॉक्सची किंमत २ लाख ८ हजार ३२० रुपये तर कारची किंमत ७ लाख रुपये इतकी आहे. अक्षय अरविंद खटावकर (२९, रा. राजापूर खडपेवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Advertisement
Advertisement
Tags :

.