Ratnagiri News: रत्नागिरीतील व्हेल माश्याच्या उलटी तस्करीतील संशयिताला अटक
06:13 PM Aug 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
रत्नागिरी: रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेने एका गुप्त मोहिमेत 2.5 किलो वजनाचे ‘अंबरग्रीस‘ (देवमाशाची उलटी) जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी शहरातील कोकणनगरमधील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीकडे ‘अंबरग्रीस’ असून तो ते विक्रीसाठी एमआयडीसी रत्नागिरी येथे घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या छाप्यादरम्यान, एजाज अहमद युसूफ मिरकर (41) हा मूळचा रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील असून सध्या शहरानजीकच्या कोकणनगर- कदमवाडी येथे राहतो. या संशयित आरोपीला अटक करण्यात आली. कोणतीही परवानगी नसताना विक्रीच्या उद्देशाने 2.5 किलो वजनाचे ‘अंबरग्रीस’ त्याच्याकडे आढळले.
आरोपीकडून 50,000 ऊपये किंमतीची एक दुचाकीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 2,50,50,000 ऊपये (2 कोटी 50 लाख 50 हजार) आहे.
संशयित आरोपी एजाज अहमद युसूफ मिरकर याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 152/2025 अन्वये वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39, 42, 43, 44, 48, 51, 57 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Advertisement
Advertisement