Ratnagiri : गर्भपातप्रकरणी साई हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना रद्द
दाखल गुन्ह्यातील चौकशीनंतर जिल्हा आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरी प्रतिनिधी
गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रूग्णांना दिल्याप्रकरणी शहरानजीकच्या टीआरपी एमआयडीसी येथील साई हॉस्पिटलवर जिल्हा आरोग्य विभागाने या हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिऊद्ध आठल्ये यांनी दिली.
ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनंत नारायण शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा बेकायदेशीर प्रकार उघडकीस आल्यामुळे चौकशी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्dया व साहित्य ठेवून त्या रूग्णांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानतंर शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाला सोबत घेऊन साई हॉस्पीटलवर छापा टाकून वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्dया, साहित्य जप्त केले होते आणि डॉ. शिगवण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यामध्ये या हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना होता. पण या बेकायदेशीर गर्भपातप्रकरणात कारवाई म्हणून आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.