महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : अंगावर कठडा कोसळून चिपळुणात विद्यार्थ्याचा मृत्यू

03:57 PM Jul 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ratnagiri News
Advertisement

चिपळूण प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात असलल्या महामार्ग भिंतीवर उभारण्यात आलेला चिरेबंदी कठडा अंगावर कोसळून त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सिद्धांत प्रदीप घाणेकर, ( 19, मूळ गाव देगाव, दापोली, सध्या लोटे) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थाचे नाव आहे.

Advertisement

शुक्रवारी कॉलेज सुटल्यानंतर सिंद्धांत घरी परतला नाही. त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात कठडा कोसळल्या ठिकाणी जाऊन आज पाहण्यात आले. त्या ठिकाणी त्याचा मृतदेह दिसून आला. या घटनेने ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली. या दुर्घटनेमुळे कॉलेज आज सोडून देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Chiplun studentratnagiri news
Next Article