महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : वानरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा; अन्यथा कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

06:26 PM Jan 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ratnagiri Monkeys
Advertisement

वानर माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब वानर माकडांचा बंदोबस्त करावा असे आवाहन अविनाश काळे या शेतकऱ्याने केला आहे. सरकारने वानरांचा बंदोबस्त केला नाही तर कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी वानर माकडांचा होणारा उपद्रव दिवसेंदिवस वाढत जात आहे. याबाबत गोळप येथील अविनाश काळे यांनी वारंवार जिल्हा प्रशासन आणि शासनाकडे वानर माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली मात्र याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस अविनाश काळे यांनी गोळप ते रत्नागिरी अशी पदयात्रा काढली.  गुरुवार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या या पदयात्रेमध्ये लवकरात लवकर वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. अन्यथा कुटुंबासह आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणीच प्रशासनाकडे केलेली आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी हजर होते. यावेळी काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री , जिल्हाधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी यांना निवेदन दिले

Advertisement

Advertisement
Tags :
Monkeysratnagiri
Next Article