कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : MIDC च्या 20 एकर जागेत वैद्यकीय महाविद्यालय, 650 कोटी रुपयांचा खर्च

11:07 AM May 21, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

राज्यात प्रथमच एमआयडीसीच्या जागेत इमारत उभी करण्याचा निर्णय

Advertisement

रत्नागिरी : रत्नागिरीत दोन वर्षांपूर्वी महिला रुग्णालयाच्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. पण राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी 20 एकर जागा आवश्यक आहे.

Advertisement

त्यानुसार राज्यात प्रथमच एमआयडीसीने 20 एकर जागा 99 वर्षे कराराने नाममात्र दरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली आहे. चंपक मैदान येथील या जागेवर राज्य सरकार व जेआयसीए संस्थेमार्फत सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. महाविद्यालयाच्या एकूण 25 विभागांसाठी या इमारतींचे बांधकाम उभे होणार आहे.

उद्यमनगर येथील चंपक मैदान येथे जेआयसीएच्या माध्यमातून 650 कोटी रुपये खर्च करून भव्य-दिव्य इमारत उभी राहणार आहे. या इमारतीच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुढील चार वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या वैभवात आणखी एका नव्या शासकीय संस्थेची मोलाची भर पडणार आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून जिह्यासाठी चार वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. जागेची उपलब्धता होत नसल्याने महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला विलंब झाला. पण दोन वर्षांपूर्वी महिला रुग्णालयाच्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येऊन येथे वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू झाला आहे. पण राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी 20 एकर जागा आवश्यक होती.

शहरानजीक एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम रखडले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला आणि उद्यमनगर येथील स्टरलाईटच्या ताब्यात असलेली अडीचशे हेक्टर जागेची न्यायालयीन लढाई पूर्ण केली. त्यामुळे एमआयडीसीच्या ताब्यात तेथील जागा घेण्यात आली आहे. त्या जागेवर राज्यात प्रथमच एमआयडीसीच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे.

आज जेआयसीएच्या पथकामार्फत प्रत्यक्ष जागा पाहणी

एमआयडीसीची 20 एकर जागा 99 वर्षे कराराने नाममात्र दरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्याबाबतचा लेखी करार पूर्ण झाला आहे. त्या जागेचा ताबा वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला आहे. जेआयसीए संस्थेमार्फत या महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेने प्राथमिक पाहणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात या इमारतीसाठी भूगर्भ तपासणी करण्यात आली आहे. बुधवार 21 मे रोजी संस्थेचे पथक प्रत्यक्ष जागा पाहणीसाठी रत्नागिरीत दाखल होणार आहे.

पावसाळ्यानंतर भूमिपूजन सोहळा

या शासकीय वेद्यकीय महाविद्यालयाला जागा उपलब्ध होण्यापूर्वी महाविद्यालयाचे 595 कोटी ऊपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु आवश्यक 20 एकर जागा प्राप्त झाल्यानंतर सुधारित अंदाजपत्रक 8 दिवसात तयार करण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नवे अंदाजपत्रक सुमारे 650 कोटी ऊपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इमारत उभारण्यासाठी आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यानंतर भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
@ratnagiri#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#uday samantGovernment Hospitalkokan newsratnagiri news
Next Article