Ratnagiri Crime News: प्रियसीसोबत बोलण्यावरून परप्रांतीय कामगाराचा खून
06:40 PM Aug 03, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मामाने भाच्याच्या छातीत आरी घुसवली
Advertisement
रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे मोबाईलच्या नव्याने सुरू होणाऱ्या दुकानात फर्निचरचे काम करणाऱ्या गोरखपूरमधील दोघा कामगारांमध्ये प्रेयसीशी बोलण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला.
Advertisement
एकमेकांचे मामा-भाचे असलेल्या दोघांमध्ये जोरदार जुंपली आणि त्यातून मामा निरज निशाद याने भाचा प्रिन्स मंगरू निशाद (25, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) याच्या छातीत फर्निचरच्या कामासाठी वापरली जाणारी लोखंडी ‘आरी’ खोलवर घुसवली. त्यात प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, खुनानंतर मामा निरज व त्याचा एक सहकारी रत्नागिरीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोघांना रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले. खूनाची ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील खडप मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीचे काम सुरू होते. सुहेल वस्ता यांनी भाड्याने घेतलेल्या दुकान गाळ्यात फर्निचरच्या कामासाठी कामगार लावले होते. त्या कामाचा ठेका गोरखपूर येथील रवीकुमार भारती या ठेकेदाराने घेतलेला होता.
भारतीसह निरज निशाद, अनुज चौरासिया व मयत प्रिन्स असे मिळून चौघे फर्निचरचे काम करत होते. शनिवारी दुपारच्या वेळेस काम सुरू असताना प्रिन्स आणि त्याचा मामा निरज यांच्यात वाद उफाळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक विवेक पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.
Advertisement
Next Article