कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratngiri News : रत्नागिरीतील 'हायटेक' बसस्थानक कसे असणार आहे?

12:04 PM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

प्रशस्त बसस्थानक इमारतीसह अनेक सोयीसुविधा युक्त अशी रचना

Advertisement

रत्नागिरी : गेली सात वर्षे रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले आहे. प्रवाशांसाठी सर्व सुविधांनी सज्ज बसस्थानक वास्तूचा लोकार्पण सोहळा 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजता परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

Advertisement

राज्य मार्ग परिवहन महामंडळ व राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार शहरातील एसटी मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला प्रारंभ झाला होता. या बसस्थानकाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस सहन करून बसस्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर थांबण्याची वेळ आली.

सुसज्ज असे बसस्थानक लवकरात लवकर बांधण्याची नागरिकांची आग्रही मागणी होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून तब्बल 17 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सव्वा वर्षात या कामाला वेग आला. पालकमंत्र्यांसह आमदार किरण सामंत यांनी व्यक्तिश: लक्ष घालून या बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यश मध्यवर्ती बसस्थानकाच्या वास्तूचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत हाती घेऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यश आले आहे. बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अंदाजे 17.50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

त्यानुसार या कामाला फेब्रुवारी 2024 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. सव्वा वर्षात ही भव्य व आकर्षक इमारत उभी राहिल्याचे बोरसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारतीसह अनेक सोयीसुविधा युक्त अशी रचना करण्यात आली आहे.

माळनाका येथील एसटीचे विभागीय मध्यवर्ती कार्यालय एसटी कर्मचार तटकरे यांनी यावेळी आश्वासन दिले आहे. वेळास कासव प्रकल्प अहवाल खासदार तटकरेंना सादर वसाहत, विरंगुळा विश्रामगृहासाठीही पालकमंत्री सामंत यानी निधी उपलब्ध करून दिल्याने या सर्व इमारतींचे रुपडे बदलल्याचे बोरसे म्हणाले.

ग्रामीण बससाठी 14 व शहरी गाड्यांसाठी 6 फलाटांची व्यवस्था

इतर कार्यालये

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#uday samantBus StopRatngiri
Next Article