महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : जिल्हा रूग्णालयाला 30 डॉक्टर्स, भूलतज्ञही उपलब्ध; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

09:21 PM Jul 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Guardian Minister Uday Samant
Advertisement

रूग्णांची परवड थांबण्यास होणार मदत

रत्नागिरी पतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता आणि तेथील वैद्यकीय सुविधा अभावी सर्वसामान्य रूग्णांना अडचणी भासू नयेत, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कटाक्षाने लक्ष घातले आहे. जिल्हा रुग्णालयाकडे 9 डॉक्टर्स होते. पण गेल्यावर्षी सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 21 डॉक्टर्सची भरती झाली आणि आणखी एक भूलतज्ञही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सद्यस्थितीत येथील रुग्णांच्या सेवेसाठी 30 डॉक्टर्स उपलब्ध झाल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

येथील जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसवण्याबाबत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय अडीअडचणींबाबत गुरूवारी बैठक घेतली. बैठकीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, कोल्हापूर उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. सतीश सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. निनाद नाफडे, डॉ. नीलेश नाफडे, माजी नगरसेवक सुहेल मुकादम आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जिह्यातील कामथे व राजापूर येथे सोनोग्राफी सेंटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयात गेल्या जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 243 ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, 539 नेत्रचिकित्सा, 328 जनरल सर्जरी आणि 626 स्त्राrरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या शस्त्रक्रिया झाल्यो त्यांनी सांगितले.

Advertisement

आता जिह्यातील कामथे व राजापूर येथे सोनोग्राफी सेंटर करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसा रत्नागिरीत एमआरआय सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. दापोली, पाली, ािापळूण येथे शासकीय ब्लॅड बँकसाठी निधी दिला जाणार आहे. मोबाईल ब्लॅड बँक व्हॅनसाठीही मंजुरी दिल्यो मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कॅन्सर प्रीडीटेक्शन युनिट सेंटर जिह्यात सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. अशापकारी युनिट देणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा राहणार असल्यो सांगितले.

औषध खरेदी, पायाभूत आरोग्य सुविधांसाठीही दिला निधी
सोनोग्राफी केंद्रासाठी सेवा देणाऱया डॉक्टरांचे मानधन तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत प्रस्ताव तयार करुन जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीसाठी द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची पाहणी करुन पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात. औषध खरेदीसाठी 10 कोटी आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी 30 कोटी दिले आहेत. या बाबतची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असेही निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत.

प्रलंबित वैद्यकीय बिलांची प्रकरणे मार्गी लावावीत
जी सुविधा शासनाने रुग्णांसाठी दिली आहे. ती तातडीने मिळाली पाहिजे, त्यासाठी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी युध्दपातळीवर काम करावे. आरोग्य क्षेत्रात चांगले काम करणे आवश्यक आहे. त्यात सुधारणा झाली पाहिजे. सिझेरियनची संख्या कमी करुन नैसर्गिक डिलीव्हरी होण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रलंबित असणारी वैद्यकीय बिले तातडीने मार्गी लावावीत. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱया अधिकारी, कर्मचायांबाबत कडक कारवाई करावी, असेही पालकमंत्री म्हणाले. मनोरुग्णालयाला मंजूर करण्यात आलेल्या 14 कोटींच्या निधीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

Advertisement
Tags :
Guardian Minister Uday SamantratnagiriRatnagiri District Hospital
Next Article