कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : रत्नागिरीत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या चौघांना अटक

01:50 PM Apr 21, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

शहर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई, तीन ठिकाणी छापे

Advertisement

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील जेलरोड, कोकणनगर, शिरगाव अशा ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून अमली पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आला आह़े पोलिसांच्या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

शहरातील मच्छीमार्केट ते जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई 18 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता करण्यात आली. नूरमोहम्मद दिलमोहम्मद खान (24) असे संशयिताचे नाव आहे, तर रात्री 10 वाजता शहरातील कोकणनगर येथील आंब्याच्या बागेत एका आंब्याच्या झाडाच्या आडोशाला गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तऊणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. किरण रामचंद्र कदम (22) असे संशयिताचे नाव आहे.

तिसऱ्या घटनेत रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शेट्योवाडी येथे एका मेडिकलच्या पाठीमागील भिंतीच्या आडोशाला गांजासदृश अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6.40 वाजता करण्यात आली. शब्बीरअली शहानवाझ पटेल (28) आणि शफाकत हसन आदम राजपूरकर (36) अशी संशयितांची नावे आहेत़ चारही संशयितांविऊद्ध पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (), 27, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
_police_action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaInvestigationRatnagiri cityratnagiri news
Next Article