For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पशुहत्येच्या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ; रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

05:16 PM Jul 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
पशुहत्येच्या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ  रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Ratnagiri Rural Police
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

शहरालगतच्या मिरजोळे एमआयडी येथे पशुहत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आह़े. ही घटना गुऊवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल़ी या प्रकाराची माहिती मिळताच संतप्त झालेल्या शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात धाव घेतल़ी तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी केल़ी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविऊद्ध गुन्हा दाखल केला आह़े.

Advertisement

दरम्यान घडलेल्या प्रकाराने संतप्त झालेला जमाव रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत़ा परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडूनही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होत़ा अखेर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जमावाने शांततेची भूमिका घेतल़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या एमआयडीसी येथे पशुचे अवशेष काही नागरिकांना आढळून आल़े या प्रकाराने पशुची हत्या झाली असल्याचा संशय उपस्थित करण्यात आल़ा दरम्यान घडल्या प्रकाराची माfिहती रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरल़ी त्यानुसार स्थानिकांनी घटनेची वास्तवता जाणून घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल़ी तसेच पोलिसांनाही याठिकाणी बोलविण्यात आले होत़े पशुची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात आल़ी तसेच घटनास्थळी असलेल्या जमावाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याकडे आपला मोर्चा वळविल़ा.

पोलीस अधीक्षकांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न
घडल्या प्रकाराने संतप्त झालेला जमाव रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा झाला होत़ा यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे रात्री उशिरा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाल़े तसेच उपस्थित जमावाला शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आल़े.

Advertisement

पोलिसांनी केला अज्ञाताविऊद्ध गुन्हा दाखल
पशुची हत्या नेमकी कुणी केली हे समजून येत नसल्याने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अज्ञाताविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा भारतीय न्याय संहिता कायदा कलम 299,325,238 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, अ व ब नुसार गुह्यांची नोंद करण्यात आल़ी गुह्यांचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महामुने यांच्याकडे देण्यात आला आह़े.

पोलिसांनी केली महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
काही प्रत्यक्षदर्शींच्या मते एका वाहनातून पशुचे अवयव खाली पडल्याचे सांगण्यात आले होत़े त्यानुसार हे वाहन पकडण्यासाठी पोलिसांकडून महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल़ी तसेच गस्तीवरील पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आल़ा मात्र हे वाहन पोलिसांना आढळून आले नाह़ी

Advertisement
Tags :

.