For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : मुंबई- गोवा महामार्गावर कारला अपघात; तिघे जखमी

12:11 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
ratnagiri   मुंबई  गोवा महामार्गावर कारला अपघात  तिघे जखमी
Ratnagiri Mumbai Goa highway
Advertisement

रायगड / प्रतिनिधी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड (जि. रायगड) तालुक्यातील चांडवे बुद्रुक येथे हुंडाई कारने कंटेनरला मागील बाजूने धडक दिल्यामुळे अपघात घडला आहे, या अपघातामध्ये कार मधील एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

या अपघाताची सविस्तर माहिती अशी की हुंडाई कार  क्रमांक MH.04.LH.3387 वरील चालक राजाराम दत्तू कडू वय ४० वर्षे रा. बदलापूर आणि निलेश हरिभाऊ शेलार (३१) रा. टिटवाळा जिल्हा ठाणे, राजकुमार गुलजारराम मल्ही (५७) रा. कल्याण प्रमोद महादेव खंडागळे ( ३७) रा. माढा, जिल्हा सोलापूर असे सावंतवाडी ते मुंबई,  प्रवास करत असताना, महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत आले असता आले असता पुढे जाणाऱ्या कंटेनर ने अचानक ब्रेक दाबल्याने, कारची कंटेनरला मागील बाजूने जोरात धडक बसली. हा अपघात रविवारी सकाळच्या सुमारास स झाला असता ही माहिती पोलिसांनी दिली.

अपघाता नंतर कंटेनर चालक न थांबता पळून गेलेला आहे. अपघातात कार चे नुकसान झालेले असून कार मधील राजकुमार गुलजारराम मल्ही यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राजाराम कडू, निलेश शेलार, प्रमोद खंडागळे यांना किरकोळ दुखापती झालेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना प्राथमिक उपचार करीता पोलादपूर  ग्रामीण रुग्णालयात दाखल दिल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले असल्याचे महामार्ग पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.