महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूच्या शिवपुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

12:24 PM Oct 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी अन् महाराजांचा जयघोषात अनावरण

Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

Advertisement

ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात, जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करुन रत्नदूर्ग शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टॕचू गॅलरीची पाहणी केली. तेथून कळ दाबून पालकमंत्री सामंत यांनी समोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पालकमंत्री. सामंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, कोकणातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या शिवसृष्टीचे आज लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पहायला मिळेल. अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उभा पुतळा आहे. जे जे स्कूल ऑफ ऑर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
Ratnagiri Arebian sea Uday samant inauguration statue of shivaji maharaj
Next Article