देवाखात सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न! भरवस्तीतील घटनेमुळे देवाखात खळबळ
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेच
देवाख प्रतिनिधी
आंगवलीपाठोपाठ चोरट्यांनी आपला मार्ग आता देवाख शहराकडे वळवला आहे. शनिवारी रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. भरवस्तीतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मुरादपूर येथील आत्माराम बांडागळे यांचे आनंदम हे सोन्याचे दुकान आहे. गेली पाच वर्षे ते व्यवसाय करत आहेत. बांडागळे हे शनिवारी सायंकाळी 7. 30 च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. रविवारी सकाळी बांडागळे दुकान उघडण्यासाठी आले असता शटर दोन्ही बाजूने उचकटलेले दिसले. चोरीच्या उद्देशाने हे शटर उााकटण्यात आल्याचे बांडागळे यांच्या निदर्शनास आले. आतील लोखंडी दरवाजामुळे चोरट्यांना चोरी करण्यात अपयश आले. बांडागळे यांनी हा प्रकार देवाख पोलिसांया निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे.
पोलिसांसमोर आव्हान
पावसाळ्यात चोरीचे पकार रोखणे हे देवाख पोलिसांसमोर आवाहन आहे. आठ दिवसांपूर्वी आंगवली येथील मार्लेश्वर मंदिरा दरवाजा फोडून चोरट्याने चोरीचा पयत्न केला होता. मात्र त्याला अपयश आले. देवाख परिसरात पावसाळ्यामध्ये चोरीच्या घटना घडतात, हे स्पष्ट होत आहे. गतवर्षी सह्याद्रीनगर येथील सुमारे सहा बंद बंगले चोरट्यांनी फोडले होते. त्या घटनेचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.