For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Gutka Ban: गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखासाठा?

11:55 AM Jun 17, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri gutka ban  गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखासाठा
Advertisement

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी केली पोलखोल

Advertisement

खेड: तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे. गुटखा रॅकेटचा पर्दाफाश करत गोदामामधून गुटखा साठा केलेला प्रकार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी उघडकीस आणला. संबंधित व्यावसायिकावर मकोका अंतर्गत कारवाई न झाल्यास आक्रमकतेचा अवलंब करण्याचा इशारा भाजपचे नेते वैभव खेडकर यांनी दिला आहे.

लोटे एमआयडीसी परिसरातून रात्रीच्या वेळी गुटख्याची राजरोसपणे वाहतूक सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. केरळ व गोवा येथून गुटखा आणून स्थानिक विक्रेत्यांना तो विकला जात आहे. याचमुळे राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही येथील परिसरातील पान टपऱ्यांवर मात्र, तरुणांना गुटखा उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असतानाही प्रशासनाकडून मात्र, कुठलीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

प्रशासनाला हा सबळ पुरावा पुरेसा आहे. मात्र, तरी देखील अजून पुरावे हवे असल्यास दिले जातील, असेही भाजपडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे गुटख्याचा साठा करून विक्रेत्यांना गुटखा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांवर कोणती कारवाई करते, याकडे नजरा रोखल्या आहेत.

Advertisement
Tags :

.