कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोडामार्ग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रत्नदीप फटी गवस बिनविरोध

04:02 PM Apr 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तर खजिनदारपदी दैनिक तरुण भारत संवादचे समीर ठाकूर

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

Advertisement

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप फटी गवस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव पदी संदेश बाबासाहेब देसाई, उपाध्यक्षपदी ऋषिकेश सिताराम धर्णे व महेश यशवंत लोंढे तर दैनिक तरुण भारत संवादचे तालुका वार्ताहर समीर रोहिदास ठाकूर यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड करण्यात आली.दोडामार्ग येथील धाऊस्कर फार्म हाऊसमध्ये तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार समितीचे सचिव बाळ खडपकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांची खास उपस्थिती होती. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली अन् चार उमेदवारांनी अध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांच्यात झालेल्या चर्चेअंती सर्वानुमते अध्यक्षपदी रत्नदीप गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर व निवडणूक निरीक्षक बाळ खडपकर यांनी रत्नदीप गवस व नवनिर्वाचित कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

नुतन कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष रत्नदीप फटी गवस, सचिव संदेश बाबासाहेब देसाई, उपाध्यक्ष महेश यशवंत लोंढे व ऋषिकेश सिताराम धर्णे, खजिनदार समीर रोहिदास ठाकूर, सदस्य प्रभाकर अंकुश धुरी, संदीप अमृत देसाई, सुहास नारायण देसाई, वैभव विद्याधर साळकर, तेजस तुकाराम देसाई, पराग महादेव गावकर, गणपत ज्ञानेश्वर डांगी, सुनील विनायक नांगरे, लखू बाबू खरवत, शंकर मधुकर जाधव, गजानन नारायण बोंद्रे, ओम शिवाजी देसाई, साबाजी उमाकांत सावंत, राजेश विलास देसाई, भिकाजी दत्ताराम गवस आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # dodamarg # journalist association
Next Article