आझादनगरजवळ रेशन तांदूळ जप्त
साडेसाठ लाखांच्या मुद्देमालासह चालक अटकेत
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
रेशनच्या तांदळाचा काळाबाजार सुरूच आहे. माळमारुती पोलिसांनी ट्रकमधून रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक करून त्याच्याजवळून ट्रकसह 8 लाख 63 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
विजय नारायण भोसले, राहणार वडगाव-पनगरी, ता. माण, जि. सातारा असे पोलिसांनी अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक ईलियास इमामसाब मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
आझादनगर येथील इंडिया गॅरेजजवळ छापा टाकून 11 हजार 700 किलो रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. केए 51 सी 5271 क्रमांकाच्या ट्रकमध्ये तब्बल 11 टन 700 किलो तांदूळ भरण्यात आला होता. जप्त तांदळाची किंमत 2 लाख 63 हजार 250 रुपये इतकी होते. तर पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकची किंमत 6 लाख रुपये इतकी होते. यापूर्वीही अनेकवेळा रेशन तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांची व बेकायदा वाहतूक करणाऱ्यांची धरपकड झाली आहे. बेळगावातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ पाठविण्यात येतो. अन्न व नागरी पुरवठा खाते व पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदा तांदूळ वाहतूक हाणून पाडली आहे.
