कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कायदा-सुव्यवस्थेसाठी तीन महिने ‘रासुका’ लागू

02:58 PM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोवा सरकारने उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील सध्याच्या परिस्थितीचा हवाला देत 5 नोव्हेंबर 2025 पासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू केला आहे. हा कडक कायदा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कृती करण्यासाठी पोलिसांना मदतगार आहे. संशयित व्यक्तींना 12 महिन्यांपर्यंत ताब्यात घेण्याची या कायद्यात तरतूद आहे. गेल्या 1 ऑगस्टपासून, अनेक गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक अटक कलमांखाली ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे.

Advertisement

परंतु हे उपाय गुह्याची पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांना आणि संघटित घटकांना निष्प्रभ करण्यासाठी अपुरे पडत आहेत, जे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी बाधा आणण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते. अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल वाढत्या जनतेच्या चिंतेमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये कार्यकर्ता ा&मा काणकोणकर यांच्यावरील कथित हल्ल्याचा समावेश आहे. राज्यात उपद्रव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर सरकार कडक कारवाई करेल, असे गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले होते. त्यानंतर रासुका लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तो लागू झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article