For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रासी व्हॅन डर ड्युसेन निवृत्त

06:22 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
रासी व्हॅन डर ड्युसेन निवृत्त
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी व्हॅन डर ड्युसेनने गुरूवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाकडून ड्युसेनला 2026-27 हंगामासाठी नवीन कराराची ऑफर देण्यात आली नव्हती. हायब्रिड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असलेल्या या आघाडीच्या फलंदाजाला गेल्या सात महिन्यांपासून राष्ट्रीय संघातही स्थान मिळाले नव्हते. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 2 एप्रिल रोजी आपल्या निर्णयाला दुजोरा दिला. त्याने आपल्या सोशल मिडीया खात्यावर एक भावपूर्ण संदेश शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या प्रवासावर प्रकाश टाकला.

व्हॅन डर ड्युसेनने पुढे सांगितले की, जरी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली असली, तरी तो आपल्या देशांतर्गत संघाचे ‘लायन्स’चे प्रतिनिधीत्व करणे सुरूच ठेवेल आणि त्यानंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे वळेल. ड्युसेनने 9 ऑक्टोबर 2018 रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेचे तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये dरप्रतिनिधीत्व केले. ऑक्टोबर 2018 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत ड्युसेनने दक्षिण आफ्रिकेसाठी 18 कसोटी, 71 वनडे आणि 57 टी-20 सामने खेळले. या प्रवासाची सागंता करताना त्याने एबी डिव्हिलियर्सनंतर संघाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम एकदिवशीय सरासरी नोंदवली.

Advertisement

50 षटकांच्या एकदिवशीय प्रकारात त्याने आपली छाप सर्वाधिक उमटवली. या प्रकारात त्याने सहा शतके आणि 17 अर्धशतके झळकावली. यामध्ये 2019 च्या सुरूवातीला खेळलेल्या पहिल्या 9 सामन्यांमध्ये नोंदवलेल्या पाच अर्धशतकांचाही समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक संघात त्याची निवड झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या एबी डिव्हिलियर्सने जेंव्हा या स्पर्धेसाठी पुन्हा उपलब्ध असल्याची तयारी दर्शवली तेंव्हाही ड्युसेनने आपले संघातील स्थान कायम राखले होते. ड्युसेनचे पहिले एकदिवशीय शतक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आले होते. त्यानंतर 2023 च्या आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषकात त्याने आणखी दोन शतके झळकावली. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या 133 धावांच्या उत्कृष्ट खेळाचाही समावेश आहे. ड्युसेनने कर्णधारपदाची धुराही सांभाळली. मे 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत आणि पुन्हा जुलै 2025 मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या तिरंगी मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.

Advertisement
Tags :

.