दिल्ली परेडसाठी रसिकाची निवड
10:34 AM Jan 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी द.म.शि. मंडळाच्या भाऊराव काकतकर कॉलेजची रसिका कंग्राळकरची निवड झाली आहे. 26 कर्नाटक बटालियन एनसीसी तिसऱ्या वर्षात असलेल्या रसिकाने बेळगाव, बळ्ळारी व बेंगळूर येथील आरडीसाठी निवड झाली. 100 हून अधिक छात्रांमधून रसिका ही एकमेव कॅडेड आहे. तिला एनसीसीचे अधिकारी सुरज पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील व अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article