‘लॉर्ड कर्जन की हवेली’मध्ये रसिका
मिर्झापूर वेबसीरिजमध्ये बीना त्रिपाणीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रसिका दुग्गल आता एका ब्लॅक कॉमेडी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लॉर्ड कर्जन की हवेली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच रसिकाने याचे पोस्टर शेअर केला असून यात मुख्य कलाकार दिसून आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुमान झा यांनी केले असून त्यांनी याद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात अर्जुन माथूर, तन्मय धनानिया आणि परेश पाहुजा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पूर्णपणे ब्रिटनमध्ये एकाच लेन्सद्वारे चित्रित करण्यात आला आहे.
हा एक रहस्यमय आणि मजेशीर कहाणी असलेला चित्रपट असून यात कॉमेडी, थ्रिलर आणि ओळख यासारख्या विषयांना दर्शविण्यात आला आहे. चित्रपटाचा प्रीमियर मेलबर्न झाला होता आणि याला अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. चित्रपटाची निर्मिती गोल्डन रेशियो फिल्म्स आणि फर्स्ट रे फिल्म्सने मिळून केली आहे.