For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘लिटिल थॉमस’मध्ये रसिका दुग्गल

07:00 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘लिटिल थॉमस’मध्ये रसिका दुग्गल
Advertisement

रसिका दुग्गल अन् गुलशन देवैया यांचा चित्रपट ‘लिटिल थॉमस’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकातील गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित एक नॉस्टॅल्जिक कहाणीने युक्त आहे. यात कौटुंबिक आणि हास्याने युक्त नाट्या दिसून येणार आहे.  चित्रपटात 7 वर्षीय थॉसमची (हृदांश पारेख) निरागस इच्छा दाखविण्यात आली आहे, त्याला एक छोटा भाऊ हवा असतो. याकरता तो स्वत:च्या आईवडिलांना (रसिका दुग्गल अन् गुलशन देवैया) एकत्र आणण्यासाठी विचित्र अन् मजेशीर गोष्टी करतो, ज्यामुळे घरात हास्यास्पद स्थिती निर्माण होतात. चित्रपटाचे दिग्दर्शन कौशल ओझाने केले आहे तर अनुराग कश्यपकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे गीत ‘दोन गुना जिंदगी’ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तर हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाद्वारे गुलशन अन् रसिका यांची अभिनयनिपुण जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. तर बालकलाकार हृदांश यानेही स्वत:च्या अभिनयाद्वारे छाप पाडण्यास यश मिळविल्याचे ट्रेलर पाहून वाटते.

Advertisement

Advertisement
Tags :

.