For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रश्मिकाचा ‘मैसा’ लवकरच झळकणार

06:23 AM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
रश्मिकाचा ‘मैसा’ लवकरच झळकणार
Advertisement

इंटेंस अवतारात दिसणार अभिनेत्री

Advertisement

‘मैसा’ हा भारतातील पहिला फीमेल-लेड पॅन-इंडिया चित्रपट असल्याचा दावा केला जात असून यात रश्मिका स्वत:च्या आतापर्यंतच्या सर्वात इंटेंस अवतारात दिसून येणार आहे. निर्मात्यांकडून जारी करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये तिची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

मैसा चित्रपटात रश्मिका एक बोल्ड अन् दमदार अवतारात दिसून येणार आहे. रश्मिकाचा हा चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे रश्मिका ही पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारून पॅन-इंडिया स्तरावर अशाप्रकारचे पॉवरफुल कॅरेक्टरर साकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ठरणार आहे.

Advertisement

रश्मिकानेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अनफॉर्म्युला फिल्म्सचे प्रॉडक्शन आणि रविंद्र पुल्ले यांच्या दिग्दर्शनात तयार ‘मैसा’ एक भावनात्मक अॅक्शन थ्रिलर असून याची कहाणी आदिवासी भागांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात आकर्षक व्हिज्युअल्स, एक खिळवून ठेवणारी कहाणी आणि रश्मिकाचा दमदार अभिनय पहायाल मिळेल असा दावा निर्मात्यांनी केला आहे. रश्मिका यापूर्वी कॉकटेल 2 चित्रपटात दिसून आली होती. तर आगामी काळात ती पती विजय देवरकोंडासोबत ‘राणाबाली’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.