For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मैसा’तील रश्मिकाचा फर्स्ट लुक

06:12 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मैसा’तील रश्मिकाचा फर्स्ट लुक
Advertisement

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये मोठमोठे चित्रपट करत आहे. पुष्पा, अॅनिमल, पुष्पा 2 आणि छावानंतर  रश्मिका आता नव्या चित्रपटाद्वारे स्वत:च्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. रश्मिका आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘मैसा’मध्ये एका दमदार अॅक्शन अवतारात दिसून येणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘मैसा’ हा रश्मिकाचा पहिला सोलो अॅक्शन चित्रपट असून यातील फर्स्ट लुक पोस्टरमध्ये तिच्या दमदार लुकची झलक दाखविण्यात आली आहे. आता रश्मिकाने चित्रपटाशी निगडित आणखी एक अपडेट शेअर केली आहे. रश्मिकाने मैसाचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री दमदार आणि प्रभावशाली अवतारात दिसून येतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन रविंद्र पुल्ले यांनी पेले आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला असून तो पाहिल्यावर चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. रश्मिकाचा हा चित्रपट चालू वर्षात प्रदर्शित होणार आहे. याची कहाणी एका समुदायाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Tags :

.