शाहिदसोबत झळकणार रश्मिका
13 वर्षांनी ‘कॉकटेल’ या चित्रपटाचा सीक्वेल तयार केला जात आहे. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत तर क्रीति सेनॉन नायिका म्हणून दिसून येणार आहे. शाहिद कपूर आणि क्रीति सेनॉनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. याचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार
असून यात क्रीति आणि शाहिदसोबत रश्मिकाही मुख्य भूमिका साकारणार आहे. 2012 मध्ये प्रदर्शित कॉकटेल हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. यात सैफ अली खान, दीपिका पदूकोन आणि डायना पँटी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले होते. रश्मिका यापूर्वी अॅनिमल, छावा आणि सिकंदर यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. यातील काही चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत. सिकंदर चित्रपटातील तिच्या अभिनयावर नकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या होत्या.